येतात मुख्यमंत्री ! जातात मुख्यमंत्री !
मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री
.
जेव्हा 'समान संधी ' त्यांना मिळेल तेव्हा
होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री !
.
सांगू नये कुणीही कोणास 'पथ्यपाणी',
जे काय खायचे ते खातात मुख्यमंत्री ...
#सुरेश_भट
करते भल्याभल्यांचे हे घात राजकारण
आणू नकोस बावा अपुल्यात राजकारण
.
पडते महाग मैत्री असते महाग नाते
हे परवडे खिशाला स्वस्तात राजकारण
.
खापर पराभवाचे माझ्याच फोड माथी
आहे म्हणे तुझ्याही रक्तात राजकारण...
©अमित वाघ
आहे जरी तुझ्या रे रक्तात राजकारण
आणू नकोस अपुल्या दोघात राजकारण
.
होता मला न आले माणूस एक साधा
अन लोक देव झाले खेळात राजकारण
.
ही शांत गाय माझी का दूध देत नाही
शिजले असेल काही कळपात राजकारण...
© अभिषेक उदावंत
पाहून राजकारण रडतेय मांडवी
कोणी तरी म्हणा रे आता पुरे करा...
©दत्तप्रसाद जोग
सत्यास ऐनवेळी टाळेल राजकारण.
उध्वस्त माणसाला गाडेल राजकारण
.
निवडून मीच येतो, वाटेल ज्या भल्याला,
त्यालाच तोंडघाशी, पाडेल राजकारण.
.
विरली हवेत येथे खोटी प्रचारयात्रा,
आता नव्या बढाया मारेल राजकारण...
©प्रा.डॉ. #गिरीश_खारकर
ना भल्याचे,ना बुऱ्याचे राजकारण.
आमचे चाकू-सुऱ्याचे राजकारण.
.
सज्जनाला फास,खोट्याचीच चांदी,
राहिले न खऱ्या खुऱ्याचे राजकारण.
.
एकमेकांच्याच ओढा शेपट्या अन,
गाजवा 'कलगी-तुऱ्याचे' राजकारण....
©गोपाल मापारी
गझल कवी घोटाळे भूकंप राजकारण
बोलत बोलत किती दूरवर आलो आपण...
© डॉ.कैलास गायकवाड
भगव्या निळ्या नि हिरव्या रंगात राजकारण
आले कुठून जाती,धर्मात राजकारण ?
.
सत्तेत अन् विरोधी पक्षात राजकारण
सामान्य माणसाचे करतात राजकारण
.
भरतात तुंबड्या ते चाऱ्यातुनी पशूंच्या
कुठल्या थरास गेले खाण्यात राजकारण..
©सौ. हेमलता पाटील
याला खरे म्हणू का निष्णात राजकारण ?
जेव्हा पराभवाचे असतात मित्र कारण....
©नितिन देशमुख
डोक्यावरी नको तू घेऊस पक्ष कुठला
तुर्तास राजकारण,फिरते दुकान आहे
.
सर्वत्र आग भरली होणे स्मशान आहे.
अस्वस्थ भारताचे हे वर्तमान आहे...
©नितीन देशमुख
धर्म,सत्ता,हवस,राजकारण,रती
सांग मदिरा तुला कोठली पाहिजे ...
©नितीन देशमुख.
राजकारण चालले कुठल्या थराला
कौरवांची पांडवांशी दिलजमाई...
© निलेश कवडे.
माझ्या तुझ्यात मित्रा नव्हतेच राजकारण.
आता न प्रेम उरले नुसतेच राजकारण
.
करण्यास लोकसेवा सत्ता तुला दिली जर
करतोस तू कशाला भलतेच राजकारण.....
©नरहर कुलकर्णी
"लोकहो देशात माझ्या हेच घडते बारमाही
राजकारण जिंकते अन् हारते ती लोकशाही...!"...
©प्रशांत वैद्य
राजकारण चालते येथे धनाने
सागराची लाट आहे गाज नाही.
© Prashaantt Gajanan Pore
राजकारण फायद्याचे
मतलबी व्यापार झाले
.
स्वार्थ, ढोंग अणिक लबाडी
जीवनाचे सार झाले...
©प्रवीण तुरणकर
राजकारण हे ' निळे आकाश ' आहे
या नभातुन रोज वर्षा होत असते...
©रुपेश देशमुख
जन्मजात लागते जात लबाडांची इथे
शिकवून कुणा राजकारण जमत नसते..
सुचरिता
नाही कधी कुणाची होणार राजनीती;
वेश्येपरी बदलते आचार राजनीती.
.
प्रेमात रोज सौदा,मैत्रीत रोज धोका;
करणार भावनांचा व्यापार राजनीती...
© डॉ. श्रीकृष्ण राऊत
प्रत्येक माणसाच्या जगण्यात राजकारण
बहुतेक या हवेच्या रक्तात राजकारण
चोवीस तास ह्यांच्या शब्दात राजकारण
आहे सराइतांच्या रक्तात राजकारण
सुटली अनेक कोडी एका क्षणात माझी
वर्षे निघून गेली कळण्यात राजकारण
© स्नेहदर्शन
दूध प्यावे, साय खावी, मांजरांनी
राजकारण का करावे गोधनाचे...
© प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
राम आणि रहिम येथे एक होते एक आहे
राजकारण होत गेले अन गळ्याला फास झाला...
© योगिता पाटील
.
जेव्हा 'समान संधी ' त्यांना मिळेल तेव्हा
होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री !
.
सांगू नये कुणीही कोणास 'पथ्यपाणी',
जे काय खायचे ते खातात मुख्यमंत्री ...
#सुरेश_भट
करते भल्याभल्यांचे हे घात राजकारण
आणू नकोस बावा अपुल्यात राजकारण
.
पडते महाग मैत्री असते महाग नाते
हे परवडे खिशाला स्वस्तात राजकारण
.
खापर पराभवाचे माझ्याच फोड माथी
आहे म्हणे तुझ्याही रक्तात राजकारण...
©अमित वाघ
आहे जरी तुझ्या रे रक्तात राजकारण
आणू नकोस अपुल्या दोघात राजकारण
.
होता मला न आले माणूस एक साधा
अन लोक देव झाले खेळात राजकारण
.
ही शांत गाय माझी का दूध देत नाही
शिजले असेल काही कळपात राजकारण...
© अभिषेक उदावंत
पाहून राजकारण रडतेय मांडवी
कोणी तरी म्हणा रे आता पुरे करा...
©दत्तप्रसाद जोग
सत्यास ऐनवेळी टाळेल राजकारण.
उध्वस्त माणसाला गाडेल राजकारण
.
निवडून मीच येतो, वाटेल ज्या भल्याला,
त्यालाच तोंडघाशी, पाडेल राजकारण.
.
विरली हवेत येथे खोटी प्रचारयात्रा,
आता नव्या बढाया मारेल राजकारण...
©प्रा.डॉ. #गिरीश_खारकर
ना भल्याचे,ना बुऱ्याचे राजकारण.
आमचे चाकू-सुऱ्याचे राजकारण.
.
सज्जनाला फास,खोट्याचीच चांदी,
राहिले न खऱ्या खुऱ्याचे राजकारण.
.
एकमेकांच्याच ओढा शेपट्या अन,
गाजवा 'कलगी-तुऱ्याचे' राजकारण....
©गोपाल मापारी
गझल कवी घोटाळे भूकंप राजकारण
बोलत बोलत किती दूरवर आलो आपण...
© डॉ.कैलास गायकवाड
भगव्या निळ्या नि हिरव्या रंगात राजकारण
आले कुठून जाती,धर्मात राजकारण ?
.
सत्तेत अन् विरोधी पक्षात राजकारण
सामान्य माणसाचे करतात राजकारण
.
भरतात तुंबड्या ते चाऱ्यातुनी पशूंच्या
कुठल्या थरास गेले खाण्यात राजकारण..
©सौ. हेमलता पाटील
याला खरे म्हणू का निष्णात राजकारण ?
जेव्हा पराभवाचे असतात मित्र कारण....
©नितिन देशमुख
डोक्यावरी नको तू घेऊस पक्ष कुठला
तुर्तास राजकारण,फिरते दुकान आहे
.
सर्वत्र आग भरली होणे स्मशान आहे.
अस्वस्थ भारताचे हे वर्तमान आहे...
©नितीन देशमुख
धर्म,सत्ता,हवस,राजकारण,रती
सांग मदिरा तुला कोठली पाहिजे ...
©नितीन देशमुख.
राजकारण चालले कुठल्या थराला
कौरवांची पांडवांशी दिलजमाई...
© निलेश कवडे.
माझ्या तुझ्यात मित्रा नव्हतेच राजकारण.
आता न प्रेम उरले नुसतेच राजकारण
.
करण्यास लोकसेवा सत्ता तुला दिली जर
करतोस तू कशाला भलतेच राजकारण.....
©नरहर कुलकर्णी
"लोकहो देशात माझ्या हेच घडते बारमाही
राजकारण जिंकते अन् हारते ती लोकशाही...!"...
©प्रशांत वैद्य
राजकारण चालते येथे धनाने
सागराची लाट आहे गाज नाही.
© Prashaantt Gajanan Pore
राजकारण फायद्याचे
मतलबी व्यापार झाले
.
स्वार्थ, ढोंग अणिक लबाडी
जीवनाचे सार झाले...
©प्रवीण तुरणकर
राजकारण हे ' निळे आकाश ' आहे
या नभातुन रोज वर्षा होत असते...
©रुपेश देशमुख
जन्मजात लागते जात लबाडांची इथे
शिकवून कुणा राजकारण जमत नसते..
सुचरिता
नाही कधी कुणाची होणार राजनीती;
वेश्येपरी बदलते आचार राजनीती.
.
प्रेमात रोज सौदा,मैत्रीत रोज धोका;
करणार भावनांचा व्यापार राजनीती...
© डॉ. श्रीकृष्ण राऊत
प्रत्येक माणसाच्या जगण्यात राजकारण
बहुतेक या हवेच्या रक्तात राजकारण
चोवीस तास ह्यांच्या शब्दात राजकारण
आहे सराइतांच्या रक्तात राजकारण
सुटली अनेक कोडी एका क्षणात माझी
वर्षे निघून गेली कळण्यात राजकारण
© स्नेहदर्शन
दूध प्यावे, साय खावी, मांजरांनी
राजकारण का करावे गोधनाचे...
© प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
राम आणि रहिम येथे एक होते एक आहे
राजकारण होत गेले अन गळ्याला फास झाला...
© योगिता पाटील
0 टिप्पण्या