नको लावून पाहू तू कधी अंदाज प्रेमाचा
कुणी हलक्यामध्ये जातो कुणाचे पारडे भारी…
©ममता सपकाळ
=================================
उरात माझ्या होते धडधड तू आल्यावर
बघून होई मनात सळसळ तू आल्यावर
श्वासात तुझ्या रोखून श्वास रात्र जागते
देहामधली सरते तडफड तू आल्यावर….
रमेश सरकाटे
=================================
त्या मिठीचा गंध मागे राहिल्यावर
वाटला हा श्वासही उपराच नंतर...
धनंजय ताडले
=================================
या येणाऱ्या श्वासांमध्ये दिसते ती
त्या जाणाऱ्या श्वासांमध्ये दिसतो मी.
निशब्द देव
=================================
पाय धरतो देह श्वासांचे सदा
ओढ आयुष्या किती लागट तुझी
प्रेम वरवरचे तुझे अन भावही
पापणी नव्हती कधी खारट तुझी..
जयदीप विघ्ने
=================================
मला फसवते ती, हेही कळतेना ..पण
प्रेम फुकाचे दरवेळी फसतेना पण
राहशील सोबत यावर शंका नाही ,
घडायचे जे असते ते घडतेना पण...
निशब्द देव
=================================
जाताजाता भरपूर रडत जा ना
काळ्यावरती हिरवे गिरवत जा ना
कारणाविना मी वाट बघत जातो
कारणाविनाही #फोन करत जा ना.
.चित्तरंजन भट
=================================
विश्व माझे व्यापलेले तूच आहे
श्वास माझे गुंतलेले तूच आहे
एकटी मी हासते अन बोलते ही
वेड जे मज लागलेले तूच आहे..
विश मिर्झापुरे
=================================
तू नसताना तू असल्याचे जाणवते अन्
श्वासांनी दरवळते वातावरण कितीदा.
आनंद रघुनाथ
=================================
दुखऱ्या मनास माझ्या,नको डागण्या सखे गं.
आवरून प्रीत घे अन,तुझ्या मागण्या सखे गं.
.
'झक मारली' प्रेम केले,मी तुझवरी सखे गं..
भलती उधारी झाली,माझ्यावरी सखे गं..
©गोपाल मापारी
=================================
तुझा मेसेज येण्याची कधीची वाट बघते मी
अता आई पुढे आहे.. सकाळी #फोन करते मी..
राधिका फराटे.
=================================
तिच्या कोरीव देहाचा कसा अंदाज वर्णावा
तिला पाहून इर्षेने तडकले आरसे काही...
राधिका फराटे.
=================================
0 टिप्पण्या