emotional marathi shayari| emotional marathi status| emotional marathi shayari on life |


दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते
प्राणपणाने चालवलेली चळवळ म्हणजे नाते

काळ उमेदीचा घालवणे गांभीर्याने सोबत
म्हातारे झाल्यावर होणे अवखळ म्हणजे नाते... 

©’ बेफिकीर


पाय तुझे वा-याचे अवखळ भिरभिरणारे
सांग विजांचे लखलख पैंजण कुठून आणू... 

©गोविंद नाईक




वाढुनी वय वाळवंटे प्रौढ झाली आपल्यामधली
राहिली नाही वयाची छान अल्लड कोवळी वाळू…

©गणेश नागवडे 


तुला कशाला सांगू आता सारे काही ?
उगा कशाला सांगू आता सारे काही ?
.
खुणावण्याचे अल्लड वय उरलेले नाही
खुणा कशाला ? सांगू आता सारे काही....

©अमितकुमार खातू



जगण्याच्या रंगमहाली इच्छांचे झुलते झुंबर
चिंतांना उडवित जगतो मनमौजी, मस्त कलंदर
.
अंगणभर बागडणारी गजलेची अवखळ बाळे
मांडीवर घेऊ त्यांना घालू मायेची पाखर...

© अल्पना देशमुख-नायक




वेदना जशी बहरत जाते
हसू निरागस उमलत जाते….

© सौ.गाथा महेंद्र आयगोळे




बारक्या मेंदूत आकस ठेवतो
चेहरा पण मी निरागस ठेवतो…

©जयदीप विघ्ने




देवा तुझ्या दरबारात
गरीबाचं स्थान काय?

तू साधा भोळा की
पुरोहिताचं कारस्थान हाय?....

©किशोर पवार




मारून टाकले मज, बालिश भेकडांनी
मौलिक विचार माझे, मरणार ना कधी ही...

©मकरंद बेहेरे




तू , मिठी आणि शांत किनारा
मी , प्रेम आणि अल्लड वारा…

©मानसी चापेकर




कुणी अल्लड म्हणा कोणी शहाणा म्हणा
जसा मी वागतो त्याला बहाणा म्हणा...

© पुरुषोत्तम वराडे




तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी...

©प्रदीप निफाडकर




सूर सारे पोचती रंध्रात माझ्या
कोण इतके वाजते देहात माझ्या ?
.
राहिली तू ही तशी बालिश वगैरे
अन् फरक पडला कुठे रागात माझ्या ?...

©रुपेश देशमुख



पाठलाग करतात किती हे जुल्मी डोळे
अवखळ, अल्लड या हरणांचे काय करू मी ?...

©रूपेश देशमुख




अल्लड अन निरागस अलवार भावना या
अजुनी गझल कोठे आली वयात आहे...

©राधिका सुर्यवंशी फराटे




तू न उरलीस प्रेयसी अल्लड
तू बदललीस बाळ झाल्यावर....

© सतीश दराडे




सरावा जन्म हा सारा अशा कैफात स्वानंदी
निरागस लेकरू तान्हे जसे झोपेत हासावे...

© श्रीकृष्ण राऊत



गिरवून अक्षरांना व्हावे कसे शहाणे.?
कैफात झींग माझी.. कैफात हे तराणे

तू सावरून घ्याव्या माझ्या खुळ्या अदा अन्..
मी ओळखून घ्यावे अल्लड तुझे बहाणे...

©सौ.सुधा पालवे




जुन्या पेटीतला खजिना पुन्हा उघडायची इच्छा
जरी नव्हतीच व्यवहारी, तरी बालिश कुठे होती?...

©शुभानन चिंचकर




झाली चर्चा पुष्कळ त्याची..हरल्यानंतर
असण्यालाही किंमत आली..नसल्यानंतर
.
नाही उरले अल्लड मी पण नात्यामध्ये
निव्वळ मैत्री..प्रेमामध्ये पडल्यानंतर..

©डॉ.स्नेहल कुलकर्णी




नाते तिचे नि माझे भलतेच द्वाड आहे
सासू खट्याळ माझी मीही लबाड आहे ..

©शिल्पा देशपांडे




गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही...

© सुप्रिया मिलिंद जाधव




तू सोबत असते तेव्हा, मन अवखळ चंचल होते
घामाचे होते अत्तर, काट्यांची मखमल होते…

© संजय इंगळे तिगावकर.




एकदा अवघ्या जगाला चांगले निरखून बघ ना
आपले दिसतील सारे आपले समजून बघ ना

जर तुला सगळीकडे शत्रुत्व दिसते तर कधीही
सावलीमध्ये पहुडलेले निरागस ऊन बघ ना....

©वैभव जोशी.



संवादाच्या रेषेवरती अजून सारे अडले आहे
कसे म्हणू मी भेटीमध्ये विशेष काही घडले आहे?
.
नजरेमधले अवखळ काही ओठांनी तू टिपून घ्यावे
मनात हे वाटते तरीही उगीच मी अवघडले आहे..

©वैशाली_शेंबेकर_मोडक.



गढूळ झाली नजर एवढी गाळ पाहुनी इथला
जरी निरागस पण कमळाचा संशय येतो आहे...

©
विशाल राजगुरु 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या