Marathi shayari on life | marathi status on life | marathi quotes on life |
भूमिका वठवायच्या कित्येक बाकी
त्यातही एग्झिट कधी माहीत नाही.
.© आनंद रघुनाथ
आदर किती..श्रद्धा किती.. नाटक किती ?
तू घालतो आहेस लोटांगन किती
दर्जा तुझा ठरणार आता यावरुन
करतोस लोकांचे मनोरंजन किती...
©आत्माराम जाधव
हो म्हण किंवा नाही म्हण तू
का नाटक दरवेळी करते..
© Devdatta Sangep
पाहुनी डोळ्यात पाणी ती म्हणाली
"तू नको मांडू नवे नाटक उगाचच !"...
© ज्ञानेश्वर शिवाजीराव कटारे
नाते इतके जाचक झाले
जगणे निव्वळ नाटक झाले..
.©कालिदास चवडेकर
पावसाळे पाहिले, भिजले कुठे?
फक्त माती लिंपली, रुजले कुठे ?
लाभली होती सुखाची भूमिका
सोंग त्याच्यासारखे सजले कुठे ?...
© क्रांति साडेकर
रंगमंचाला नटांचे वावडे नाही
अभिनयाचे वेगळेपण भावले माझे
भूमिका ही भेटली मज विविध पैलूंची
कसब सारे मी पणाला लावले माझे....
©कविता-डावरे
खरेच होते प्रेम तुझ्यावर
तुला वाटले नाटक माझे....
©ममता सपकाळ
पडदा पडला नाटक सरले
पाहण्याचा कंटाळा आला
संथ एकदा व्हावे म्हणतो
वाहण्याचा कंटाळा आला...
©नितीन देशमुख
मृत्यू म्हणजे पडदा असतो
नाटक सरते जो पडल्यावर ...
©निशांत पवार.
आयुष्य माणसाचे बघ रंगमंच आहे
समजू नकोस याला केवळ खयाल मित्रा...
©निर्मला सोनी
आयुष्या, मी तुझ्या मनाचे केले असते
प्रामाणिक, आग्रही भूमिका तुझीच नव्हती...
©रणजीत पराडकर
हे सारे जगणे म्हणजे जर नाटक आहे तर..
संकटामधे थोडासा घाबरून पाहू का ?...
©रुपेश देशमुख
जाळुनी आयुष्य मी साकारली जी भूमिका
राख होता शेवटी ती संपली एकांकिका ...
©राधिका फराटे
ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो..
©सुशांत खुरसाले
प्रेमाच्या नाटकात मी करतो कैद्याची भुमिका
हृदयात पिंजरा माझ्या पायात साखळी आहे !.....
© सुधीर सुरेश मुळीक
जगाला रंगमंचाची जरी उपमा दिली आहे
रिहर्सल होत नाही पण इथे कुठल्याच अंकाची ...
© स्वाती शुक्ल
जी गालावर आली ती बट काढू का
बोलण्यास एखादे खुसपट काढू का
या विश्वाला जर ती रंगमंच म्हणते
तर माझ्यातुन एखादा नट काढू का...
© सतीश दराडे
नाटक दु:ख लपवण्या उत्तम वठवत गेलो
हसण्यामधुनी अश्रू सहजच लपवत गेलो...
© विजयकुमार देशपांडे
0 टिप्पण्या