गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय,
महागाईने पिचलेल्याला होळी काय, दिवाळी काय…
©.ए.के.शेख.
जठरात पेटल्या पणत्या..
पोटास दिवाळी घडली..अमित वाघ.
©अमित
चिडली की, स्मशान होते माझे अंगण
तू हसली की, सडा सारवण, रंग दिवाळी...
Abhishek Udawant
इच्छांच्या फुलबाज्या अन् तोरण स्वप्नांचे
कधी दिवाळी कधी साजरा दसरा होतो..
अल्पना देशमुख-नायक
सुखाला पाहिले नाही दिवाळी बोलते माझी
नका देऊ शुभेच्छांना तयाने ठार मी झालो...
@एजाज शेख
अवेळी फटाके उडवसी कशाचे
दिवाळी न करती दिवे एकट्याचे...
.©अजय पांडे
अंगास लावले मी उटणे पहाट काळी
माझ्या घरात आली ही कोवळी दिवाळी...
©अनिल जाधव
आयुष्याची होळी करतो
नंतर गरीब दिवाळी करतो….
©अरविंद उन्हाळे
आली पुन्हा दिवाळी कर साजरी नव्याने
तू ओत आसवे अन् पेटव दिवे दिव्याने ...
©आबेद शेख
भरवसा कोठे तसाही कोणत्या विस्तवाचा
तशी होळी की दिवाळी सांगता येत नाही. ….
©बाळ पाटील
आली पुन्हा दिवाळी घेऊन तारकांंना,
आजन्म जोडलेल्या साऱ्याच माणसांना
.
सजवून ठेवले मी अंगण सूरेख माझे
तुमची जणू प्रतिक्षा दारातल्या दिव्यांना...
alaji
घरात यंदा कशी साजरी करू दिवाळी?
उभ्या पिकांवर अवकाळीची छाया काळी...
©हेमलता पाटील
घरट्यातल्या पिलांची आई निघून गेली
कसली अता दिवाळी हा पाडवा कशाला ?.
©कांचन कानतोडे
चंद्रा घरी दिवाळी, ताऱ्यांघरी दिवाळी
मी सूर्य, पण तरीही, माझीच रात काळी...
©कलीम खान.
तुझ्या एकाच कवितेने सजवले रंग होळीचे..
दिवाळी साजरी केली तुझ्या एकाच शेरावर...
©ममता सपकाळ
घरी तू पाहिजे होतीस यंदाही दिवाळीला
तुझे चोरून मी सारे फटाके फोडले असते....
©महेश जाधव
पिढ्यांचा द्वेष हा जाऴा..गडे हो या दिवाऴीला...
खरा माणूस ओवाळा...गडे हो या दिवाळीला..
.
तमाने मागणी केली,दिव्यांना एक होण्याची....
दिव्यांची वाटणी टाळा...गडे हो या दिवाळीला...
Nitin Deshmukh
रोजला आशा नका ठेवू दिवाळीची
राहुद्या लक्षामधे संक्रांत येते ती…
©प्रमोद खराडे
दिव्याखाली खरी खोटी दिव्याची सावली असते
जिथे अंधार नसतो ना, तिथे दीपावली असते.....
राजीव मासरूळकर
दिवाळी वरी मी जरी शेर लिहिला तरी खर्च नाही कमी व्हायचा
उभा जन्म गेला फटाक्या प्रमाणे धमाका क्षणार्धात संपायचा .
.Radhika Prem Sanskar
उंदिराच्या बिळातुनी काढा
पायलीभर गहू दिवाळीला...
Satish Darade
पंचमी दसरा दिवाळी अष्टमी कोजागिरी
माणसांवाचुन कसे हे साजरे करणार सण ?...
©सुप्रिया मिलिंद जाधव
दिवाळीची सफाई होत राहिल
मनातिल जळमटे काढू अगोदर ...
©सुप्रिया मिलिंद जाधव
येते तशीच जाते होळी असो दिवाळी
आता इथे सणांची उरली कुठे नवाई..
.©रुपेश देशमुख.
नको लावूस वाती कालच्या फुसक्या फटाक्यांना
कधी होतात का उत्सव शिळ्या निर्जीव नात्यांचे...
© सदानंद बेंद्रे 'मुसाफ़िर'
दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा...
©सुशांत खुरसाले.
काल एकदा गहाण पडला पुन्हा सातबारा
त्यामुळेच तर घरात आली आमच्या दिवाळी...
©संतोष शेळके
तुला पाहून धीराने दिवाळी साजरी केली
तुझा आधार असल्याने दिवाळी साजरी केली
तुझ्याविण संपलो होतो कधीचा मी जगासाठी
तुझा होऊन जगल्याने दिवाळी साजरी केली....
©विशाल ब्रह्मानंद राजगुरु
दीप चेतव अंतरी तू
ही खरी असते दिवाळी...
©विनोद बुरबुरे
होळीत रंगला ना माझ्यासवे कधी तू
करशील जी दिवाळी अपुल्याच अंगणी कर...
विजय उतेकर.
सख्या भेटला तू मला ज्या क्षणाला
क्षणालाच त्या काल झाली दिवाळी
.
दिवस सारखे सर्व गरिबास वाटे
कधी सांग त्याला मिळाली दिवाळी...
Anita Bodke
धर्माचा सूर्य बुडावा एखाद्या सायंकाळी
एकाच तिथीला यावी,यंदाची ईद-दिवाळी....
Gopal Tulshiram Mapari
दिवे दोन नयनी तुझ्या पाहिले मी
अता रोज होते जिवाची दिवाळी...
डॉ. शिवाय काळे
बांधावरी सुखाची पणती जळेल तेंव्हा
राज्यामधे दिव्यांच्या होईल रे दिवाळी...
विश्वास कुलकर्णी
तू हसली की, सडा सारवण, रंग दिवाळी...
Abhishek Udawant
इच्छांच्या फुलबाज्या अन् तोरण स्वप्नांचे
कधी दिवाळी कधी साजरा दसरा होतो..
अल्पना देशमुख-नायक
सुखाला पाहिले नाही दिवाळी बोलते माझी
नका देऊ शुभेच्छांना तयाने ठार मी झालो...
@एजाज शेख
अवेळी फटाके उडवसी कशाचे
दिवाळी न करती दिवे एकट्याचे...
.©अजय पांडे
अंगास लावले मी उटणे पहाट काळी
माझ्या घरात आली ही कोवळी दिवाळी...
©अनिल जाधव
आयुष्याची होळी करतो
नंतर गरीब दिवाळी करतो….
©अरविंद उन्हाळे
आली पुन्हा दिवाळी कर साजरी नव्याने
तू ओत आसवे अन् पेटव दिवे दिव्याने ...
©आबेद शेख
भरवसा कोठे तसाही कोणत्या विस्तवाचा
तशी होळी की दिवाळी सांगता येत नाही. ….
©बाळ पाटील
आली पुन्हा दिवाळी घेऊन तारकांंना,
आजन्म जोडलेल्या साऱ्याच माणसांना
.
सजवून ठेवले मी अंगण सूरेख माझे
तुमची जणू प्रतिक्षा दारातल्या दिव्यांना...
alaji
घरात यंदा कशी साजरी करू दिवाळी?
उभ्या पिकांवर अवकाळीची छाया काळी...
©हेमलता पाटील
घरट्यातल्या पिलांची आई निघून गेली
कसली अता दिवाळी हा पाडवा कशाला ?.
©कांचन कानतोडे
चंद्रा घरी दिवाळी, ताऱ्यांघरी दिवाळी
मी सूर्य, पण तरीही, माझीच रात काळी...
©कलीम खान.
तुझ्या एकाच कवितेने सजवले रंग होळीचे..
दिवाळी साजरी केली तुझ्या एकाच शेरावर...
©ममता सपकाळ
घरी तू पाहिजे होतीस यंदाही दिवाळीला
तुझे चोरून मी सारे फटाके फोडले असते....
©महेश जाधव
पिढ्यांचा द्वेष हा जाऴा..गडे हो या दिवाऴीला...
खरा माणूस ओवाळा...गडे हो या दिवाळीला..
.
तमाने मागणी केली,दिव्यांना एक होण्याची....
दिव्यांची वाटणी टाळा...गडे हो या दिवाळीला...
Nitin Deshmukh
रोजला आशा नका ठेवू दिवाळीची
राहुद्या लक्षामधे संक्रांत येते ती…
©प्रमोद खराडे
दिव्याखाली खरी खोटी दिव्याची सावली असते
जिथे अंधार नसतो ना, तिथे दीपावली असते.....
राजीव मासरूळकर
दिवाळी वरी मी जरी शेर लिहिला तरी खर्च नाही कमी व्हायचा
उभा जन्म गेला फटाक्या प्रमाणे धमाका क्षणार्धात संपायचा .
.Radhika Prem Sanskar
उंदिराच्या बिळातुनी काढा
पायलीभर गहू दिवाळीला...
Satish Darade
पंचमी दसरा दिवाळी अष्टमी कोजागिरी
माणसांवाचुन कसे हे साजरे करणार सण ?...
©सुप्रिया मिलिंद जाधव
दिवाळीची सफाई होत राहिल
मनातिल जळमटे काढू अगोदर ...
©सुप्रिया मिलिंद जाधव
येते तशीच जाते होळी असो दिवाळी
आता इथे सणांची उरली कुठे नवाई..
.©रुपेश देशमुख.
नको लावूस वाती कालच्या फुसक्या फटाक्यांना
कधी होतात का उत्सव शिळ्या निर्जीव नात्यांचे...
© सदानंद बेंद्रे 'मुसाफ़िर'
दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा...
©सुशांत खुरसाले.
काल एकदा गहाण पडला पुन्हा सातबारा
त्यामुळेच तर घरात आली आमच्या दिवाळी...
©संतोष शेळके
तुला पाहून धीराने दिवाळी साजरी केली
तुझा आधार असल्याने दिवाळी साजरी केली
तुझ्याविण संपलो होतो कधीचा मी जगासाठी
तुझा होऊन जगल्याने दिवाळी साजरी केली....
©विशाल ब्रह्मानंद राजगुरु
दीप चेतव अंतरी तू
ही खरी असते दिवाळी...
©विनोद बुरबुरे
होळीत रंगला ना माझ्यासवे कधी तू
करशील जी दिवाळी अपुल्याच अंगणी कर...
विजय उतेकर.
सख्या भेटला तू मला ज्या क्षणाला
क्षणालाच त्या काल झाली दिवाळी
.
दिवस सारखे सर्व गरिबास वाटे
कधी सांग त्याला मिळाली दिवाळी...
Anita Bodke
धर्माचा सूर्य बुडावा एखाद्या सायंकाळी
एकाच तिथीला यावी,यंदाची ईद-दिवाळी....
Gopal Tulshiram Mapari
दिवे दोन नयनी तुझ्या पाहिले मी
अता रोज होते जिवाची दिवाळी...
डॉ. शिवाय काळे
बांधावरी सुखाची पणती जळेल तेंव्हा
राज्यामधे दिव्यांच्या होईल रे दिवाळी...
विश्वास कुलकर्णी
0 टिप्पण्या