[ 100+ Best valentine day marathi shayari with photos ]
तुझे बिलगणे, हसणे, रुसणे म्हणजे त्रास जिवाला नंतर,
जगण्याचेही भान हरावे इतकी सजा नसावी सुंदर...
अनिल आठलेकर.
नशाही फुलांची, उतारा फुलांचा
तुझा स्पर्श नुसता शहारा फुलांचा...
अन्वी अनिल आठलेकर.
राहते पाणी कुठे पाणी तसे साधे
स्पर्शही असतो किती चवदार एखादा....
अमोल शिरसाट
तुझी मिठी वावटळ, देह गारुडला सारा
रोमरोमात दाटला तुझ्या श्वासांचा पसारा
जिथे आवराया जावे खुणा तुझ्याच भेटती
दिस सरला, सरेना अंगभरला शहारा....
आनंद पेंढारकर
घालतो मजला भुरळ हा सांजवारा आजही!
स्पर्शिता त्याने मला येतो शहारा आजही....
अनिता बोडके.
आठवे ती मिठी तो शहारा तुझा
रात्र विरहात ही जागताना शपथ...
अनिता बोडके.
भरल्या ढगांसम.. बरसाया आतुर
झुर झुरणारी, सरी पावसाची
तुझे धाव घेणे.. मजला बिलगणे
कोसळणारी, सरी पावसाची .....
अनंत कदम.
तुझी नजर अन तुझे इशारे
तुझे बिलगणे तुझे शहारे
तुझीच व्याप्ती, तुझे रितेपण
तुझेच सारे, तुझेच सारे..
अदिती कापडी
तिच्या हळुवार स्पर्शाने किती गंधाळतो पाउस
गुलाबी स्पर्श होतो अन् सुगंधी लाजतो पाउस
विजांची पेरणी करतो जरी वादळ मुठीमध्ये
तरी नुसत्याच नावाने तिच्या ओशाळतो पाउस..
बंडू सुमन अंधेरे
तुझ्याप्रमाणे तहानलेली इथे कधीची जमीन आहे
तुझ्यात पाऊस धुंद आहे , तुझा शहारा नभात आहे...
चंद्रशेखर बादशाह.
सये, यौवनाचा पहा सांजतारा ,
फुलावा तनूवर शहारा कशाला ?
तुझी रूपकैफी मिठी पांघरावी ,
हवा चांदण्याचा उबारा कशाला ?
दास पाटील.
काठावरुनी काठावरुनी बघणे झाले..
मला सांग तू खरेच का हे जगणे झाले..?
वेल बिलगली झाडासोबत, खुशीत आहे..
मला म्हणालीस, 'असले काय बिलगणे झाले ?'
ज्ञानेश वाकुडकर.
तिच्या डोळ्यात लाटांचा शहारा शोधतो आहे
हरवलेल्या समुद्राचा किनारा शोधतो आहे..
गवि. मिटके
अरे हे काय वारा मागतो आहे ?
उन्हापाशी शहारा मागतो आहे ?...
गोविंद नाईक.
बदलती बदलती हवा पाहिजे
फुलाला शहारा नवा पाहिजे
असे भाग्य उजळून यावे कधी
तुझा स्पर्श अन गारवा पाहिजे..
जयदीप विघ्ने
तुझ्या त्या मिठीची नशा ही शराबी;
पुन्हा आठवावे, पुन्हा सावरावे...
© सौ.ज्योती शिंदे
झरे स्पंदनातून आतूर प्रीती
कसा रे कळेना तुला हा इशारा ?
तुझ्या श्रावणाच्या सरी जीवघेण्या,
फुलेना पिसारा, उठेना शहारा..
क्रांति साडेकर.
नाही हमी कशाची नाही मुळीच खात्री;
मेनूत पाहिलेले पडले कधी न पात्री...
रक्तात शब्द पेरा पाजा कुणास गाणे;
यावा कसा शहारा उगवून थंड गात्री..
खलील मोमीन.
इंद्रियांना खोदल्यावर कळत गेले
या सुखांच्याही मुळाशी स्पर्श असतो.
कमलाकर देसले
जीवनाचा पसारा किती ..
सावल्यांचा सहारा किती ..
सांजवेळी मनी काहिली ,
देहभर हा शहारा किती ..
काश्मिरा पाटील .
भिडते लवकर ह्रदयाला जे
मी त्याला आलिंगन म्हणतो
सुगंधास ज्या नाग बिलगतो
मी तर त्याला चंदन म्हणतो...
कालिदास चवडेकर.
देह विसरला शहारा तरी तळमळ मागे उरलेली
अजून माझ्या उरात आहे तसाच कोमट श्वास तुझा
पैसा, इमले, स्पर्श, प्रतिष्ठा सगळी झाडे कोसळली
ऐलतिरावर उभा अजुनही एक जीर्णसा ध्यास तुझा
कौस्तुभ अरुण आठल्ये.
नको तू पाठवू राणी..अशी वा-यासवे चुंबन
जरा ओठांस ओठांनीच दे या आज आलिंगन.
लक्ष्मण उगले
अजुन आठवे धुंद शहारा तुझ्या मिठीचा !
मनात माझ्या वसे निवारा तुझ्या मिठीचा !
जपुन ठेवले कुपित मनाच्या श्वास गुलाबी !
आवडतो मज वरी पहारा तुझ्या मिठीचा !.
सौ.मानसी चापेकर.
[ वेलेन्टाइन मराठी शायरी ]
स्मृतींची चाळता पाने, किती हळुवार होते मी
तुझा रेशीम स्पर्श असतो रे प्रत्येक पानाला ....
मानसी चापेकर.
विषय नसे जर जीविता का मग उरते असणे देहाचे?
मनास जपण्या प्रदान होती विषयपिंजरे मोहाचे
विषय टाळणे उत्तर नसते असते प्रजनन प्रश्नांचे
करून धिटाई आलिंगन दे, अवडंबर का विषयाचे?.
मेघा देशपांडे
तुझा ओल्या मिठीमधला शहारा पाहिजे होता
जरा पाऊस होता सर्द वारा पाहिजे होता...
मनोज दसुरी.
शहारा येण्यासाठी थंडीच असावी
अस काही नसतं
मन गुलाबी असलं कि ते
केव्हाही थरथरतं....
मंजुषा पवार.
तिच्या अंगास साधा स्पर्श ही नव्हता
बुडालो मी तिच्या खाईत नजरेने….
निखिल खामगांवकर
जर गझल म्हणजे ऋतूंचा गोषवारा
शेर असतो ... पाकळीवरचा शहारा...
प्रशांत वैद्य.
इथे मनाच्या हिंदोळ्यावर
रावा माझा झुलतो गं...
जपून ठेवला एक शहारा
बघुन त्याला भुलतो गं...
पूजा फाटे.
तुझ्या माझ्या मिठीचा जो निरागस सोहळा होतो,
जरासा बाटल्याने स्पर्श ही मग सोवळा होतो.....
पूजा फाटे.
का शहारा नाचला अंगावरी माझ्या ?
रूप वा-याचे तुझे स्पर्शून जाताना..
पूजा भडांगे.
तुझ्या हातचा स्पर्श भासतो मोरपिसाची काया
मखमल फिरते चेहऱ्यावरती आणिक निळसर माया.
पूजा जगदिश भडांगे
स्पर्श ,कामना , तृष्णा , ईश्वर
गझल लिहावी कशा- कशावर ?
रुपेश देशमुख.
पावसाळी मेघ आले याद आली
आठवांचे थेंब झाले याद आली
तो किनारा तो शहारा आठवेना
छान ऎसे खेळ चाले याद आली...
रवींद्र जवादे.
ओरबाडूनी हजारो वादळे गेली तनाला
कोणताही स्पर्श देऊ ना शके आता शहारा !...
राजीव मासरूळकर.
धरेला ऊन टेकावे ..पुन्हा जावे तसे काही
तुझ्या माझ्यातले नाते ... क्षणापुरते ..असे काही
शहारा दावतो देहास किमया खोल स्पर्शाची
कुणाच्या चुंबनाचे खोलवर उरले ठसे काही...
राधिका फराटे.
आतली चलबिचल ओळख ना
या डोळ्यांचा कल ओळख ना...
स्पर्श तुझा मनकवडा आहे
मग थोडी धांदल ओळख ना......
सतीश दराडे
एकेक स्पर्श ने तू आत्मीक पातळीवर
मिरवू नको फुले ही नुसतीच कातडीवर….
सतीश दराडे
माझा जुना शहारा परतून दे मला
नुसतेच पाकळ्यांवर दव शिंपडू नको...
सतीश दराडे
शांत ठिणगीवर शहारा आणते फ़ुंकर तुझी
पेटला जर का निखारा, तू मला सांगू नको...
सुधीर मुळीक
अजूनी तुझ्या कल्पनेने शहारा
झुले वास्तवाने मनाची डहाळी
तुझी रात्र होती...मिठी घट्ट होती
तुझे टेकले ओठ होते कपाळी....
श्रीपाद जोशी.
किती अनावर झाली होती किणकिणताना
तुझी कंकणे मिठीत माझ्या स्थिरावताना
कॉफी, कविता, ओठ, स्पंदने आणि शहारा
अंगणात भररात्री पाउस कोसळताना...
श्रीपाद जोशी.
पहाटेस कोणी मला सावरावे?
कसे सोडवावे धुक्याच्या मिठीला
असे गुंतणे होत जाते मनाचे
उन्हाचे बिलगणे जसे सावलीला...
श्रीपाद जोशी.
तुझा एक साधा शहारा असावा
पुरेसा मला तो इशारा असावा...
सदानंद बेंद्रे.
किती धावतो काळ बेभान होतो
तरी गाठतो आठवांचा शहारा
उरी याद राखा जरा आरशांनो
वयाने रुपाचा उडे रोज पारा...
डॉ.संतोष कुलकर्णी.
आलिंगन मिळण्याचे मिळती क्षण, तेव्हाही
काय जपावा कोपऱ्यातला जाळ न कळते ...
डॉ.संतोष कुलकर्णी.
पहाटे असा छेडतो गार वारा
तनावर फिरवतो फुलांचा पिसारा
मिठी मारतो स्पर्शितो रोम सारे
किती वेळ रोखायचा मी शहारा...
संतोष वाटपाडे
आलिंगन हाक अबोला
होकार नकार दुरावा
श्वासांना शेवट कळतो
स्पर्शांचा हतबल कावा...
संतोष वाटपाडे
तारुण्य देत आहे देहावरी शहारा
रात्री जपा जिवाला दिवसा जरी पहारा.
संतोष वाटपाडे
बटा सारल्या बोट लावून त्याने
उरी स्पर्श झाले किती तीव्रतेने
पदर हालला दंश मानेस झाला
करु काय उफ्फ हे जहर जीवघेणे
संतोष वाटपाडे.


0 टिप्पण्या